spot_img

Mumbai MHADA Lottery 2026 : मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडाकडून २५०० घरांची मोठी भेट!

spot_img

मार्चअखेर जाहिरात प्रसिद्ध होणार; पहा कोणत्या भागात मिळणार हक्काचे घर

मुंबईसारख्या स्वप्न नगरीत हक्काचे घर असावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने एक मोठी खुशखबर आणली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल २५०० घरांसाठी विशेष सोडत काढण्याची जय्यत तयारी केली असून, या लॉटरीची अधिकृत जाहिरात येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस झळकणार आहे. प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष सोडत काढली जाण्याची दाट शक्यता आहे.

या लॉटरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात बोरिवली (मागाठाणे), सायन (प्रतीक्षा नगर) आणि विक्रोळी यांसारख्या मोक्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. अत्यल्प (EWS), अल्प (LIG), मध्यम (MIG) आणि उच्च (HIG) अशा सर्वच उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील. सुरुवातीला ५००० घरांचे नियोजन होते, परंतु गोरेगावच्या पत्रा चाळ प्रकल्पाचे काम अपूर्ण असल्याने म्हाडाने केवळ तयार घरांचाच (Ready Possession) या सोडतीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून विजेत्यांना ताब्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

खाजगी बिल्डरांच्या घरांचे दर आवाक्याबाहेर गेले असताना, म्हाडाची ही परवडणारी घरे मुंबईकरांसाठी मोठी संधी ठरणार आहेत. मार्चमध्ये जाहिरात आल्यानंतर इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळेल. त्यामुळे जर तुम्हीही मुंबईत घर घेण्याच्या तयारीत असाल, तर आपली आवश्यक कागदपत्रे आतापासूनच तयार ठेवावीत, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ