spot_img

Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांची नवी कोरी ‘इनोव्हा’ वादाच्या भोऱ्यात

spot_img

नव्या सत्ताधाऱ्यांकडून केंद्राच्या नियमांना हरताळ फासल्याची टीका

मुंबई महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर रितू तावडे सध्या त्यांच्या नव्या अधिकृत गाडीमुळे चर्चेत आल्या आहेत. महापौरांच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या टोयोटा इनोव्हा गाडीवर बसवण्यात आलेल्या लाल आणि निळ्या फ्लॅशिंग दिव्यांनी नवा वाद पेटवला आहे. केंद्र सरकारने २०१७ मध्येच सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास कडक बंदी घातली असताना, मुंबईत मात्र या नियमाला बगल दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली असून, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’च्या भूमिकेत असलेल्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

महापौरांच्या नव्या गाडीच्या पुढच्या भागात (फ्रंट ग्रिल) आणि ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडीवर पोलिसांप्रमाणे दिवे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत, “नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. केंद्राच्या १ मे २०१७ च्या अधिसूचनेनुसार, केवळ आपत्कालीन सेवा (पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका) वगळता कोणालाही असे दिवे वापरता येत नाहीत. ९ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘व्हीआयपी कल्चर’ संपवण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता, परंतु मुंबई पालिकेत आता पुन्हा जुनी संस्कृती परतल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबई पालिकेतील शिवसेनेची २५-३० वर्षांची सत्ता उलथवून लावल्यानंतर भाजपने कारभारात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापौर, उपमहापौर आणि विविध समिती अध्यक्षांसाठी १३ नवीन आलिशान गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. यात महापौरांसाठी ३० लाखांची इनोव्हा आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी १८ लाखांच्या स्कॉर्पिओ गाड्यांचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करून लावलेले हे दिवे आणि नामफलक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, मुंबईकर आणि राजकीय विश्लेषकांमधून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ