Mumbai Local : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर पाच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

spot_img

देखभाल कामासाठी मध्य रेल्वेने घेतला ब्लॉक; लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक नक्की तपासा

मुंबईकरांच्या प्रवासाचा कणा असलेली मध्य रेल्वे येत्या रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी आपल्या उपनगरीय मार्गावर मोठा मेगा ब्लॉक घेणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, याचा मुख्य फटका हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी फिरण्याचे किंवा कामाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांनी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हार्बर मार्गावरील स्थिती:

पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११:०५ ते सायंकाळी ४:०५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर ब्लॉक असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणारी आणि तिथून येणारी वाहतूक विस्कळीत होणार आहे. सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ या दरम्यान CSMT हून पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या गाड्या रद्द राहतील, तर पनवेलहून CSMT कडे येणाऱ्या गाड्या सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ या काळात धावणार नाहीत. मात्र, प्रवाशांची सोय म्हणून ब्लॉक काळात CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.

ट्रान्स-हार्बर आणि इतर सेवा:

ठाणे-पनवेल या ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉकचा परिणाम दिसेल. ठाण्याहून पनवेलकडे जाणारी वाहतूक सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० पर्यंत आणि पनवेलहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ पर्यंत बंद असेल. दिलासादायक बाब म्हणजे, ठाणे-वाशी-नेरूळ आणि बेलापूर-नेरूळ-उरण (पोर्ट मार्ग) या विभागांत लोकल सेवा सुरू राहील. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे असून, प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ