spot_img

Mumbai Local Accident : मुंबईत तीन प्रवासी धावत्या लोकलमधून रुळावर कोसळले; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

spot_img

मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या लोकलमधून तीन प्रवासी अचानक खाली पडले. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती रेल्वे (Local) पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तिन्ही प्रवाशांना तातडीने सायन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन प्रवाशांची प्रकृती स्थिर असून एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची ओळख पटली असून गोवंडी येथील रहिवासी 36 वर्षीय अफझल चौधरी, नालासोपारा येथील रहिवासी 21 वर्षीय सचिन विश्वकर्मा आणि कुर्ला येथील रहिवासी 25 वर्षीय जैनिल सय्यद अशी त्यांची नावे आहेत. जखमी प्रवाशांचे सविस्तर जबाब नोंदवल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल असे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ