spot_img

Mumbai Kalachowki Crime : काळाचौकीत प्रेमप्रकरणातून रक्तरंजित हत्याकांड, तरुणाने प्रेयसीवर हल्ला करून स्वतःचा जीव संपवला!

spot_img

नर्सिंग होममधील चाकूहल्ल्याने परिसरात दहशत; पोलिसांचा तपास सुरू

मुंबईच्या काळाचौकी (Mumbai Kalachowki) परिसरात शुक्रवारी (ता. २४ ऑक्टोबर २०२५) सकाळी एका प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना घडली. २४ वर्षीय मनिषा यादव या तरुणीवर तिच्या माजी प्रियकराने, सोनू बराई याने, नर्सिंग होममध्ये चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मनिषा गंभीर जखमी झाली असून, स्थानिकांच्या मदतीने तिला तात्काळ टॅक्सीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला केल्यानंतर सोनूने त्याच चाकूने स्वतःवर वार करून आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा आणि सोनू यांच्यात प्रेमसंबंध होते, परंतु सोनूच्या वारंवार संशयामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत होती.

आठ-दहा दिवसांपूर्वी या वादातून त्यांचे ब्रेकअप झाले होते. शुक्रवारी सकाळी सोनूने मनिषाला शेवटची भेट घेण्यासाठी नर्सिंग होममध्ये बोलावले. तिथे पुन्हा वाद उफाळला आणि राग अनावर झालेल्या सोनूने मनिषावर चाकूने वार केले. जीव वाचवण्यासाठी मनिषाने नर्सिंग होममध्ये आश्रय घेतला, पण सोनू तिथेही घुसला आणि तिच्यावर वारंवार हल्ला केला. यानंतर त्याने स्वतःलाही जखमी केले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली.काळाचौकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि परिस्थिती याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ