Mumbai Crime News : वसईत अमानुष प्रकार; किरकोळ वादातून चार वर्षांच्या बालकावर क्रूर हल्ला

spot_img

वसई परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका छोट्याशा वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने निष्पाप चार वर्षांच्या मुलावर निर्दयी हल्ला केल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, वसई पश्चिमेतील एका सोसायटीत राहणारे अतुल कोंढारे यांचा त्याच ठिकाणी राहणाऱ्या रिक्षाचालक संदीप पवार याच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या रागातून आरोपीने कोंढारे यांच्या मुलगा विघ्नेशवर सूड उगवला. मुलं खेळत असताना विघ्नेश रिक्षात बसला असता, आरोपीने इतर मुलांना दूर करून त्याला लक्ष्य केले.

यानंतर त्याने मुलाचे डोके लोखंडी भागावर आपटले, त्याला रिक्षातून ओढून बाहेर काढले आणि हवेत उचलून जमिनीवर आपटले. एवढ्यावरच न थांबता त्याला फरफटत नेत आणखी मारहाण केली. या हल्ल्यामुळे विघ्नेश गंभीर जखमी झाला असून त्याला  वॉकहार्ट रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

घटनेच्या वेळी मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीलाही आरोपीने मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्यामुळे संताप आणखी वाढला आहे.

मिरा रोड परिसरातील पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने आपल्या कृत्याबद्दल कोणतीही खंत न दाखवता “मी बदला घेतला” असे निर्लज्जपणे सांगितल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ