Mukul Choudhary : लखनौ सुपर जायंट्सला गवसला हिरा, वडिलांच्या संघर्षाचे मैदानावर सोने करणार मुकुल चौधरी कोण?

spot_img

आयपीएलच्या झगमगाटात प्रत्येक वर्षी एक असा तारा चमकतो जो संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला लावतो. यंदा हे नाव आहे मुकुल चौधरी. काल कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात जेव्हा लखनौची नौका ७ बाद १२८ धावांवर बुडत होती, तेव्हा २१ वर्षांच्या या तरुणाने अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. अवघ्या २७ चेंडूत ५४ धावांची तुफानी खेळी करत मुकुलने सिद्ध केले की, त्याला विकत घेण्यासाठी लखनौने लावलेली २.६० कोटींची बोली सार्थ होती.

मुकुलचा हा प्रवास सोपा नव्हता. राजस्थानच्या सीकरमधील ‘एसबीएस क्रिकेट अकादमी’तून सुरू झालेला हा प्रवास जयपूरच्या सराव मैदानापर्यंत पोहोचला. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही, “मुलाने क्रिकेटर बनावे” हे वडिलांचे स्वप्न मुकुलने आपल्या बॅटीच्या जोरावर जिवंत ठेवले. लिलावाच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये याच्यासाठी मोठी चुरस रंगली होती, मात्र लखनौने बाजी मारली. आज त्याच विश्वासाचे रूपांतर लखनौच्या विजयात झाले असून, आयपीएल २०२६ चा हा नवा सेन्सेशन घराघरात चर्चेचा विषय ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ