spot_img

Mrunal Thakur : बेबी बंपचा फोटो व्हायरल, खरंच मृणाल ठाकूर प्रेग्नंट आहे?

spot_img

लग्नाच्या चर्चांनंतर अचानक समोर आलेल्या व्हायरल फोटोमुळे चाहते संभ्रमात, सत्य काय ते समोर आलं

दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपासून तिच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या. कधी तिचं नाव एखाद्या अभिनेत्यासोबत जोडलं जात होतं, तर कधी दुसऱ्याशी. मात्र, या सर्व चर्चांवर मृणालनं कायम मौन बाळगलं.

अशातच अचानक सोशल मीडियावर तिचा एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती बेबी बंपसह दिसत होती. विशेष म्हणजे, तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता वरुण धवन होता, जो तिची काळजी घेताना दिसत होता. हा फोटो समोर येताच चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. लग्नाच्या चर्चांनंतर थेट गरोदरपणाच्या अफवा पसरू लागल्याने सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आलं.

काही युजर्सनी मृणाल खरोखरच गरोदर असल्याचा दावा केला, तर काहींनी हा तिच्या आगामी सिनेमाचा भाग असल्याचं सांगितलं. या चर्चांना आणखी हवा मिळाली, कारण काही दिवसांपासून तिचं नाव अभिनेता धनुषसोबतही जोडलं जात होतं. त्यामुळे अनेकांनी या व्हायरल फोटोचा संबंध तिच्या वैयक्तिक आयुष्याशी लावण्यास सुरुवात केली.

मात्र, थोड्याच वेळात आणखी एक व्हिडीओ समोर आला आणि सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला. हा बेबी बंप मृणालच्या आगामी प्रोजेक्टसाठी असल्याचं स्पष्ट झालं. शूटिंगदरम्यानचा हा लूक असल्याचं समोर येताच, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना ब्रेक लागला.

दरम्यान, या घटनेनं एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली की, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा किती वेगानं चर्चेचा विषय बनतात. मृणाल ठाकूरच्या बाबतीतही हेच पाहायला मिळालं, जिथे एका व्हायरल फोटोमुळे संपूर्ण सोशल मीडिया ढवळून निघाला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ