Model Harshil Kalia Dies Road Accident : जयपूरमध्ये भीषण कार अपघातात मॉडेल हर्षिल कालियाचा मृत्यू !

spot_img

जयपूरमध्ये घडलेल्या एका अत्यंत भीषण कार अपघातात प्रसिद्ध मॉडेल हर्षिल कालियाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी उशिरा रात्री शिप्रा पथ रोडवर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षिल कामावरून घरी परतत असताना अचानक तिच्या कारवरील नियंत्रण सुटले. काही क्षणांतच कार वेगाने जाऊन डिव्हायडरवर आदळली आणि त्यानंतर उलटली. अपघात इतका भयंकर होता की वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी उलटलेली कार सरळ करून गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या हर्षिलला बाहेर काढले आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून तो पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासात अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

हर्षिल कालिया ही मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती आणि तिने ‘Crime Next Door’ या वेब सिरीजमध्येही काम केले होते. तसेच अनेक राजस्थानी म्युझिक व्हिडिओंमध्ये ती झळकली होती. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग होता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ