Mobile Charger : चार्जर सतत प्लगमध्ये ठेवता? तुमचं लाईट बिल वाढण्यामागचं हेही एक कारण!

spot_img

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे घरातील फॅन, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे आधीच वीज बिल वाढलेलं असताना, काही छोट्या सवयीही खर्चात आणखी भर घालतात. त्यापैकी एक सामान्य सवय म्हणजे मोबाईल चार्जर वापरल्यानंतरही तो सतत प्लगमध्ये ठेवणे.

अनेकांना वाटतं की फोन जोडलेला नसेल तर चार्जर वीज वापरत नाही. पण प्रत्यक्षात तसं नसतं. चार्जर प्लगमध्ये असताना तो थोड्या प्रमाणात वीज वापरत राहतो, ज्याला ‘स्टॅंडबाय पॉवर’ किंवा ‘वॅम्पायर पॉवर’ म्हटलं जातं. जरी हा वापर कमी असला तरी घरातील अनेक उपकरणे सतत स्टॅंडबायवर असल्यास त्याचा परिणाम एकूण वीज बिलावर जाणवू शकतो.

याशिवाय, चार्जर कायम प्लगमध्ये ठेवल्यास तो गरम होण्याची शक्यता असते, विशेषतः जुने किंवा कमी दर्जाचे चार्जर वापरत असाल तर. यामुळे चार्जरचं आयुष्य कमी होऊ शकतं आणि काही वेळा सुरक्षेचाही धोका निर्माण होऊ शकतो.

म्हणूनच, वीज बचतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी वापर झाल्यानंतर चार्जर प्लगमधून काढून ठेवण्याची सवय लावणं अधिक फायदेशीर ठरतं. तसेच, नेहमी चांगल्या दर्जाचा आणि विश्वासार्ह ब्रँडचा चार्जर वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ