spot_img

MNS Deepotsav : उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, शिवाजी पार्कवर राजकीय समीकरणे बदलणार?

spot_img

ठाकरे बंधूंचा दीपोत्सव धमाका शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

मुंबई, 17 ऑक्टोबर 2025: यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर होणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) दीपोत्सव सोहळा केवळ उत्सवापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो राजकीय वर्तुळातही मोठा धमाका घडवणार आहे. कारण, या सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार आहेत. आज सायंकाळी 6:30 वाजता शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव छापले गेले असून, यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये सातत्याने होणाऱ्या भेटी आणि एकमेकांच्या निवासस्थानांवरील सौहार्दपूर्ण संवाद यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. विशेषत: गेल्या दोन महिन्यांत तब्बल सहा वेळा या दोघांची भेट झाली आहे, त्यापैकी दोन भेटी गुप्तपणे झाल्या.

5 जुलै रोजी मराठी विजयी मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव एकाच मंचावर दिसले होते. त्यानंतर 24 जुलै रोजी उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली. 27 ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले, तर 10 सप्टेंबरला उद्धव यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्यासह शिवतीर्थवर अडीच तास चर्चा केली. 5 ऑक्टोबरला राज ठाकरे मातोश्रीवर गेले, आणि 12 ऑक्टोबरला स्नेहभोजनासाठी राज यांचे कुटुंबीय मातोश्रीवर पोहोचले.या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती आता जवळपास निश्चित मानली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन पक्षांमधील जागावाटप आणि औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. राजकीय जाणकारांच्या मते, शिवाजी पार्कवरील हा दीपोत्सव सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारा ठरू शकतो. ठाकरे बंधूंची ही एकत्र येण्याची प्रक्रिया दिवाळीच्या प्रकाशात राजकीय मैदान गाजवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ