आजच्या धावपळीच्या जीवनात मायक्रोवेव्ह हि माणसाची गरज बनली आहे. महिलांच्या स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील उपकरण झाले आहे. मायक्रोवेव्हमध्ये (microwave)दोन मिनिटांत अन्न गरम करता येत आणि थंड झालेला चहा परत गरम करून मिळतो.त्यासोबतच ऑफिसमध्ये देखील बारायचदा गार जेवण खावं लागत म्हणून बऱ्याच कंपन्या मायक्रोवेव्हची (microwave) सोया करून देतात. या वापर संधर्भात लोकांना नेहमी एक प्रश्न राहतो मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न कर्करोगाला (Cancer )कारण ठरते का? यामुळे कर्करोग होऊ शकतो का? अनेकजण सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जाते. पण काय आहे या मागील सत्य ?
जागतिक संशोधन संस्थांच्या म्हणण्यानुसार, मायक्रोवेव्ह मध्ये फक्त अन्नातील पाण्याला तापवतात ज्यामुळे अन्न किरणोत्सर्गी होत नाही किंवा थेट कॅन्सर तयार होण्याची शक्यता राहत नाही. मात्र तुम्हाला माहित नसल्यामुळे काही सर्वसामान्य चुका धोकादायक ठरू शकतात.
१) प्लॅस्टिकच्या (plastic )डब्यांमध्ये अन्न गरम करू नये. प्लास्टिक गरम झाल्यावर त्याचे हानिकारक रसायनं अन्नात मिसळतात. हे रसायन शरीरात गेल्याने दीर्घकाळात कॅन्सरचा धोका वाढू शकतो. काचेचे किंवा सिरेमिकचे डबे यांचा वापर करावा.
२)ॲल्युमिनियम फॉईल किंवा स्टीलची भांडी जेवण गरम करण्यास वापरू नये ते ठेवल्यास स्पार्क होऊ शकतोआणि मोठे नुकसान होऊ शकते.
३) अन्न जास्त वेळ गरम ककरून खाल्याने देखील शरीराला हानी होऊ शकते.
४) वाफ बाहेर निघू न दिल्यास कंटेनर फुटण्याची शक्यता असते .
त्याबरोबरच गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी. मायक्रोवेव्हमधील गरम केलेले अन्न गर्भाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सुरक्षित कंटेनरचा वापर करावा.
कोणती काळजी घ्याल?
1) नेहमी Microwave Safe असलेला डबा वापरावा
2) अन्नाला आवश्यक तेवढाच वेळ गरम कराव
3) झाकण थोडे उघडे ठेवावे
4) कोरडे पदार्थ खूप वेळ गरम करू नये
5) मशीन आतून बाहेरून स्वच्छ ठेवावी.
मायक्रोवेव्ह स्वतः कॅन्सरचे कारण नाहीये .पण जर चुकीचे कंटेनर, जास्त तापवणे आणि अज्ञानातून होणाऱ्या चुका यामुळे ते आरोग्यासाठी घातक ठरू शकत. म्हणून सुरक्षित पद्धतीने मायक्रोवेव्हचा वापर करा तो शरीरासाठी हानिकारक ठरणार नाही.




