spot_img

Mental Health : भारतात मनोरुग्ण उपचारापासून का वंचित? धक्कादायक माहिती आली समोर

spot_img

डिप्रेशन (Depression), अ‍ॅनझायटी, ओव्हरथिंकिंग यांसारख्या मानसिक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. मानसिक आजारांबाबत समाजात असलेल्या भीती आणि संकोचामुळे अनेक जण आपली समस्या उघडपणे मांडत नाहीत. यामुळे संबंधित व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नसून आजार अधिक बळावण्याची शक्यता असते. अलीकडेच इंडियन सायकेट्रिक सोसायटी (Indian Psychiatric Society) यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण आणि तज्ज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नैराश्य, चिंता विकार, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया यांसारख्या मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले कोट्यवधी नागरिक उपचारांपासून दूर आहेत. अनेक रुग्णांना आपला आजार वेळेवर ओळखता येत नाही. त्यामुळे ते अनेक वर्षे निदान न होता जगत राहतात आणि आजार हळूहळू बळावतो.

सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, किशोरवयातील मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या जवळपास 80 टक्के मुला-मुलींना कोणतेही नियमित मानसिक आरोग्य उपचार मिळत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही स्थिती अधिक गंभीर असून, 84 टक्क्यांपेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती उपचार व्यवस्थेपासून दूर आहेत. या उपचारांच्या अभावाचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणातील प्रगती, रोजगाराच्या संधी, कौटुंबिक नातेसंबंध तसेच एकूण सामाजिक जीवनावर होत आहे. त्यामुळे मानसिक आजारांची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबत पुरेशी झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ