spot_img

MC Mary Kom Onler Controversy : भारताची बॉक्सिंग स्टार मेरी कोम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात,पतीने केले गंभीर आरोप

spot_img

भारताची सर्वात यशस्वी आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेली बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम (Mary Kom) सध्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे चर्चेत आली आहे. मेरी कोम आणि तिचे पती के. ओनलर कोम यांच्यातील वाद आता उघडपणे समोर आला असून, दोघांकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मेरी कोमच्या पती के. ओनलर कोम यांनी अलीकडेच वृत्तसंस्था IANS ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले. ओनलर यांच्या म्हणण्यानुसार, मेरी कोमचे 2013 साली एका कनिष्ठ (ज्युनियर) बॉक्सरसोबत प्रेमसंबंध होते. या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र त्या काळात कुटुंबीयांच्या मध्यस्थीने तडजोड झाली आणि प्रकरण तेथेच थांबले, असे ओनलर सांगतात.

पुढे त्यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, 2017 पासून मेरी कोमचे मेरी कोम बॉक्सिंग अकादमीत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत संबंध होते. या दाव्यांसाठी आपल्याकडे त्या व्यक्तीच्या नावासह व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि इतर खासगी संदेश असल्याचेही ओनलर यांनी म्हटले. “माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, पण इतकी वर्षे मी शांत राहिलो,” असे सांगत त्यांनी आता मौन तोडल्याचे स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ