बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherjee) हिच्या ‘मर्दानी 3’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सनी देओलच्या ‘ बॉर्डर 2’नंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. त्यामुळे राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 3’ला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर राणी मुखर्जी चाहत्यांच्या भेटीला आली असून बॉक्स ऑफिसवर ‘मर्दानी 3’ दमदार कमाई करताना दिसत असून बॉक्स ऑफिसवर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ हा चित्रपट आता थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या विकेंडच्या वेळी चित्रपटाने 17.50 कोटींची कमाई केलेली आहे, तर जगभरात 26.70 कोटींची कमाई केलेली आहे. ‘मर्दानी 3’ चित्रपटाने रिलीजच्या दिवशी 4 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 7.25 कोटींची कमाई केली आहे. अशापद्धतीने एकूण 17.50 कोटींची कमाई केलेली आहे. या चित्रपटाची तीन दिवसांत जेमतेम एकूण कलेक्शन 20.70 कोटी रुपयांची कमाई केली. परदेशात, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत परदेशातून 6 कोटी रुपये कमावले. परिणामी, चित्रपटाने पहिल्या विकेंडला जगभरात एकूण 26.70 कोटी रुपये कमावले आहेत.




