spot_img

Manjusha Nagpur & Shrikant Jagtap Win PMC Election : निवडणुकीच्या आधीच भाजपच्या बाजूने निकाल फिरला,कल्याणसह पुण्यात भाजपचा बिनविरोध विजय

spot_img

पुणे महानगरपालिकेसाठीच्या मतदानापूर्वी भाजपनं पुण्यात विजयाचा श्रीगणेशा केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ३५ (ब) मधील उमेदवार मंजुषा नागपुरे आणि ३५ (ड) मधील उमेदवार श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण पसले आहे. नागपुरे यांच्या या विजयामुळे आता त्यांना सलग तिसऱ्यांदा नगरसेवक होण्याचा मान मिळणार आहे. तर, श्रीकांत जगताप हे दुसऱ्यांदा भाजपच्या माध्यमातून नगरसेवक झालेले आहे.

KDMC मध्ये 8 उमेदवार बिनविरोध –

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(Ravindra Chanvan) यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने विजयाचा शंखनाद फुंकला आहे. सुरुवातीला दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानंतर पक्षाने पहिल्या विजयाचा जल्लोष केला होता. त्यानंतर रविंद्र चव्हाण प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप(BJP) उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपने केडीएमसीत(KDMC) विजयाची हॅट्रिक साधली होती. यानंतर अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या वाढत गेली असून, आता एकूण 8 भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ