spot_img

Mandana Karimi : “भारताने माझी फसवणूक केली”; अभिनेत्री मंदाना करिमीचा भारत सोडण्याचा निर्णय!

spot_img

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंच्या मृत्यूनंतर मंदानाचे खळबळजनक विधान; ‘बॅगा भरून’ मायदेशी परतण्याची तयारी

‘बिग बॉस’ फेम इराणी अभिनेत्री मंदाना करिमी सध्या तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली आहे. पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती असताना आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर, मंदानाने मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सुरक्षेच्या कारणास्तव भारत सोडून आपल्या मायदेशी म्हणजेच इराणला परत जाण्याचे जाहीर केले आहे. भारतात अनेक वर्षे राहूनही, गेल्या काही काळापासून तिला अत्यंत एकटे वाटत असून भारताने आपली ‘फसवणूक’ केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.

मंदाना म्हणाली की, जेव्हा तिने इराणमधील राजकीय परिस्थिती आणि खामेनेई यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली, तेव्हा तिच्या जवळच्या भारतीय मित्र-मैत्रिणींनी तिच्याकडे पाठ फिरवली. “खूप कमी वयात मी या देशात आले, इथल्या सिनेसृष्टीने मला ओळखी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. मात्र आता माझी मानसिक ओढाताण होत आहे,” असे ती भावूक होत म्हणाली. इराणमधील कट्टरतावादी राजवट ही ‘कर्करोगा’सारखी असून आता तिथली परिस्थिती बदलत आहे, असे तिचे मत आहे. स्वतंत्र इराणचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असल्याने तिने आता बॅगा भरून मायदेशी जाण्याची तयारी पूर्ण केली आहे.

तिच्या या निर्णयामुळे आणि “भारताने फसवणूक केली” या विधानामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इराणमध्ये महिलांना स्वातंत्र्य मिळावे आणि त्यांनी मुक्तपणे शिक्षण घ्यावे, यासाठी ती गेली अनेक वर्षे लढा देत होती. आता खामेनेई यांच्या मृत्यूनंतर तिथे लोकशाही येईल आणि महिलांना त्यांचे हक्क मिळतील, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. ‘भाग जॉनी’ आणि ‘कॅयाकूल ३’ सारख्या चित्रपटांत झळकलेली मंदाना आता कायमची बॉलिवूडला रामराम ठोकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ