spot_img

Manache Shlok : ‘मनाचे श्लोक’ चित्रपटावरून वादाची ठिणगी, प्रदर्शन तात्पुरते स्थगित

spot_img

हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आणि नव्या नावाने पुन्हा प्रदर्शनाची घोषणा

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’(Mrunmayi Deshpande) या मराठी चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांच्या तीव्र विरोधामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही थिएटरमध्ये संघटनांनी गोंधळ घालून चित्रपटाचे शोज बंद पाडले. या पार्श्वभूमीवर मृण्मयीने चित्रपटाचे प्रदर्शन तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला असून, 16 ऑक्टोबरपासून नव्या नावाने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.या वादामागील प्रमुख कारण आहे चित्रपटाचे नाव आणि त्यातील विषय. ‘मनाचे श्लोक’ (Manache Shlok) हे नाव समर्थ रामदास स्वामी यांच्या आध्यात्मिक ग्रंथाशी जोडले गेले आहे, जो हिंदू धर्मीयांसाठी पवित्र मानला जातो. चित्रपटात लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक आणि वादग्रस्त विषयाचा समावेश असल्याने अनेकांनी यावर आक्षेप घेतला.

हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक सुनील घनवट (Sunil Ghanwat) यांनी सांगितले की, “मनाचे श्लोक हा ग्रंथ शतकानुशतके लोकांना भक्ती आणि आत्मशिस्तीचा मार्ग दाखवतोय. त्याला मनोरंजनाचे साधन बनवणे हे हिंदू भावनांचा अपमान आहे.” काही नेटकऱ्यांनी तर, “आज ‘मनाचे श्लोक’ नावाने लिव्ह-इन रिलेशनशिप दाखवली, उद्या ‘ज्ञानेश्वरी’ नावाने काहीही दाखवतील,” अशी खोचक टीका केली आहे.सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळाने चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती, परंतु ती फेटाळली गेली. त्यानंतर 10 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित झाला, पण काही ठिकाणी थिएटरमध्ये गोंधळ घालून शोज थांबवण्यात आले. या घटनेनंतर मृण्मयीने प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अनेक मराठी कलाकारांनी मृण्मयीला पाठिंबा दर्शवत शोज बंद पाडणाऱ्या कृतीचा निषेध केला आहे. हा वाद कला स्वातंत्र्य आणि धार्मिक भावनांच्या टकरावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणतोय.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ