spot_img

Malad Station Stabbing Case : मालाडच्या आलोक सिंह हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

spot_img

24 जानेवारी रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड रेल्वे स्टेशनवर रागातून आलोक सिंह या प्राध्यापकाची हत्या करण्यात आली होती. ओंकार शिंदे या व्यक्तीने भांडण झाल्यानंतर संतापाच्या भरात आलोक सिंहवर वार केला होता. यामध्ये आलोकच्या किडनीजवळ गंभीर इजा झाली अन् तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक अँगल समोर येत असताना आता पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागला आहे.आलोक सिंह हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

लोहमार्ग पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेला चिमटा (Tongs) अखेर जप्त केला आहे. आरोपी ओंकार शिंदे याने पळ काढताना हा चिमटा एका आरओबीवरून (ROB) फेकून दिला होता, ज्याचा शोध पोलीस गेल्या काही दिवसांपासून घेत होते.स्थानिक पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानक परिसरातील शोधमोहीम राबवून हे हत्यार हस्तगत केले आहे. 24 तारखेला लोकलमधून उतरताना झालेल्या एका किरकोळ वादातून या भीषण हत्येची घटना घडली होती. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले आणि त्यात आरोपीने आलोक सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मालाड स्थानक येण्यापूर्वी झालेल्या वादानंतर ओंकार शिंदेला त्याच्या बॅगेत इमिटेशन ज्वेलरीचे काम करण्यासाठी वापरला जाणारा चिमटा असल्याचे लक्षात आले. त्याने बॅगेतील चिमटा बाहेर काढला. आणि आलोककुमार सिंह यांना चिमटा खुपसवून पळून तो पळून गेला. आलोक सिंह यांच्या पोटात चिमटा जोरात भोसकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान या तरुण शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ