Make Waterproof Kajal At Home : केमिकल काजळांना रामराम! घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक, सुरक्षित आणि वॉटरप्रूफ काजळ

spot_img

संवेदनशील डोळ्यांसाठी बाजारातील महागड्या काजळांऐवजी घरगुती उपाय ठरत आहेत अधिक सुरक्षित आणि फायदेशीर

मेकअपमध्ये डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काजळाला खास महत्त्व असते. काजळामुळे डोळे उठावदार दिसतातच, शिवाय अनेक जण डोळ्यांची स्वच्छता आणि थंडावा मिळतो या विश्वासानेही काजळ लावतात. मात्र, सध्या बाजारात मिळणाऱ्या बहुतेक काजळांमध्ये केमिकल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हेच केमिकल्स डोळ्यांना फायदा देण्याऐवजी जळजळ, खाज, लालसरपणा आणि पाणी येणे यांसारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकतात.

विशेषतः ‘वॉटरप्रूफ’ या नावाखाली विकली जाणारी महागडी काजळे संवेदनशील डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अनेकजण आता नैसर्गिक आणि सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. यामध्ये घरच्या घरी बनवलेले आयुर्वेदिक काजळ हा उत्तम पर्याय मानला जातो.

घरगुती काजळ बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी दिवा किंवा लहान स्टीलची वाटी घ्यावी. त्यात शुद्ध तूप किंवा नारळाचे तेल घालून कापसाची जाड वात पेटवावी. नंतर दिव्यावर स्वच्छ स्टीलची प्लेट उलटी ठेवावी, जेणेकरून धुरामुळे काळी काजळी प्लेटवर जमा होईल. ही काजळी स्वच्छ चमच्याने काढून त्यात १-२ थेंब शुद्ध तूप किंवा बदाम तेल मिसळावे. इतक्यात नैसर्गिक, केमिकलमुक्त काजळ तयार होते.

हे घरगुती काजळ पूर्णपणे नैसर्गिक असल्याने डोळ्यांना जळजळ किंवा खाज सुटण्याचा धोका कमी असतो. तूप किंवा तेलामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि कोरडेपणाही कमी होतो. अनेकांच्या मते, नियमित वापरामुळे डोळ्यांचा थकवा कमी होण्यासही मदत होते. लहान मुलांसाठी आणि संवेदनशील डोळ्यांसाठी हे काजळ अधिक सुरक्षित मानले जाते.

काजळ लावताना हात आणि डोळ्यांभोवतीचा भाग स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छ काडी, कापूस किंवा बोटाच्या सहाय्याने थोड्याशा प्रमाणात काजळ पापण्यांच्या रेषेवर हलक्या हाताने लावावे. जास्त काजळ लावल्यास ते पसरू शकते, त्यामुळे मर्यादित प्रमाणात वापर करणेच योग्य ठरते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ