spot_img

Mahashivratri Special Train : कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीसाठी धावणार विशेष गाड्या

spot_img

प्रवाशांनो महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हीही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सणाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष निर्णय घेतला आहे.

CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्या असणार आहेत. मध्य रेल्वेच्या सहकार्याने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड ते सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे सणासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गांड्याचे थांबे कोणते असतील?

या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सवर्धा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ असे महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड ही विशेष गाडी तीन फेऱ्यांमध्ये धावणार आहे. ही गाडी सीएसएमटी येथून 14, 19 आणि 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुटणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोड येथून याच तारखांना सायंकाळी 5.20 वाजता गाडी सुटेल. ही विशेष रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 4.05 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ