spot_img

Maharashtra Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतली अमित शहांची भेट

spot_img

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अमित शहांच्या भेटीला

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीसाठी अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या इतर खासदारांसोबत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही अमित शहांची भेट घेतली आहे. त्यामुळे दिल्लीत नेमकं काय घडतंय अशी चर्चा सुरू झाली आहे. या नेत्यांनी अमित शाह यांची भेट का घेतली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी महानगर पालिकेतील जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शहा यांनी राज्यात जिथे शक्य असेल तिथे युती करा अशा सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांनी युती करण्यास अमित शहा यांना हरकत नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ