महाराष्ट्राचं सरकार (Maharashtra Government) शेतकऱ्यांच्या पाठी कायम खंबीरपणे उभं राहील आहे. आपण या सर्व गोष्टीबद्दल जाणून आहेत..परंतु काही लोक मिठाचा खडा पण टाकत असतात. “भाजप (BJP)म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं अत्यंत गरजेच आहे. म्हणून मोर्चा कोणी काढावा व कोणी काढू नये यावर लोकशाहीत असलेल्या प्रत्येक नागरिकांला ठरवण्याचा अधिकार आहे. याकरताच मविआ एकत्र येऊन मोर्चा काढतेय.हा मोर्चा का काढला जातोय? त्यांच्या मागण्या काय आहेत? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत. प्रत्येक निवडणूक येण्याआधी कोणतं ना कोणतं नाटक रचलं जात आणि सामान्य जनतेला भुरळ घातली जाते. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीने वेगवेगेळे नरेशन सेट करतो, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला.
“लोकसभा निवडणुकीच्यावेळेला (Loksabha election)सुद्धा देशाबाहेरील काही एनजीओ व अशी काही सूत्र आहेत सातत्याने हा देश अखंड राहू नये काहींना काही प्रयत्न करत असतात. इथली असणारी सुरक्षितता आणि इथला कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येतील, यासाठी पारितोपरी प्रयत्न करत असते. असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.
“लोकसभेच्यावेळेला सुद्धा संविधानासंदर्भात असाच खोटा नरेटिव्ह तयार करण्यात आला. या अशा नरेटिव्हमुळे समाजामध्ये चुकीचे आणि गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच मविआ करते. त्यांना या गोष्टीचा फायद होतो. याची अनेक उदहारण ही आपण सर्वांसामोर असून हे सर्व लक्षात घेता कोणकोणत्या एनजीओ यात काम करतात? त्या सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळतेय या गूढ गोष्टीबद्दल सगळ्या गोष्टी जगजाहीर झाल्या आहेत” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
“महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी (Devendra Fadanvis)महायुती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येईल, या भूमिकेत काम करतात. मध्यंतरीच्या काळात महापुराचा संकट हे शेतकऱ्यांवर आलं पण हे सरकार मायबाप म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलं. .
समाजातील असणारी व्यवस्था चांगली राहिली पाहिजे. लोकांच्या चांगल्यासाठी व्यवस्थने पारदर्शक असावं. एका नवीन पद्धतीने नरेटिव्ह करता येऊ शकतो का? याची ट्रायल मोर्चाच्या माध्यमातून मविआ करतेय” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.




