spot_img

Local Body Election : शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक भेट; निवडणूक आयोगाला सादर करणार निवेदन

spot_img

निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा,

लोकशाही बळकट करण्याचा संकल्प महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडत आहे. प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) आणि मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येत आहेत. हे दिग्गज नेते राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि संविधानाच्या चौकटीत व्हाव्यात, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांचा सहभाग या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त करून देतो आहे.शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतेच राज ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या संभाव्य सहकार्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. त्यानंतर आता हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ एकत्र येऊन निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही या शिष्टमंडळात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास वाढावा आणि लोकशाही अधिक मजबूत व्हावी, हा या भेटीचा उद्देश आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष व्हाव्यात, तसेच संविधानाचे पूर्ण पालन व्हावे, अशी सर्व राजकीय पक्षांची मागणी आहे. यासाठीच हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाशी संवाद साधणार आहे.विशेष बाब म्हणजे, शरद पवार यांनी मंत्रालयात अनेक वर्षांनंतर पाऊल ठेवणार आहे. यापूर्वी मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर त्यांनी तिथे भेट दिली होती. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये या शिष्टमंडळात सहभागी होण्यावरून मतभेद आहेत. काही नेत्यांचा मनसेबरोबर जाण्यास विरोध आहे.दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती, आणि आता अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर होईल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ