आजकाल दिवसाला भारतीय पोशाखांपासून (Indian wear) ते वेस्टर्न (Western wear) आउटफिट्सपर्यंत अनेक फॅशन ट्रेंड येत आहेत. सर्वांपेक्षा हटके, अट्राक्टिव्ह लूकस हे फॅशन ट्रेंड फॉलो सुद्धा केले जातात. पण, आकर्षक लूकसाठी फक्त फॅशन ट्रेंड फॉलो करणे महत्वाचे नसते त्यासाठीं शरीराचा आकार आणि उंचीही लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकदा उंचीने कमी असणाऱ्या मुली हिल्स घालून उंची वाढवण्याचा प्रयत्न करतात. हे तुमच्या आकर्षक लूकसाठी पूर्ण नाही. हिल्ससोबत कपड्यांची योग्य निवड करणे देखील आवश्यक आहे. जर तुमची उंची कमी असेल व तुम्हाला उंच दिसायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही आउटफिट आयडिया घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये त्याच वापर केल्यास तुमची उंची वाढलेली दिसेल.
पाहिले आहे स्ट्रेट फिट पँटस. तुम्हाला जर उंच दिसायचे असेल तर स्ट्रेट फिट पँट वापरण्यास सुरुवात करावी. स्ट्रेट फिट पँट (Straight fit pants) फॉर्मल शर्ट किंवा टॉप तुम्ही घालू शकता. यामुळे उंच दिसण्यास मदत होईल.यानंतर येत हाय वेस्ट जीन्स (Hogh waist jeans) – एक-दोन तरी हाय वेस्ट जीन्स खरेदी कराव्यात. यात शक्यतो निळा आणि काळा रंग निवडावा. ज्यामुळे पाय लांब दिसतात व तुम्ही उंच दिसता. मोनोक्रोमॅटिक आउटफिट्समुळे उंची जास्त दिसते. यात एकाच रंगाचे कपडे असतात. ज्यामध्ये टॉप आणि पँट अथवा किंवा सलवार एकाच रंगाची असते. एकाच रंगामुळे उंची जास्त दिसण्यास मदत होते. सर्वात बेस्ट शॉर्ट कुर्ती –हल्ली कॉटन प्रिटेंड कुर्तीचा ट्रेंड आहे. तुम्ही पलाझो, जीन्स किंवा लूझ पँटसोबत शॉर्ट कुर्ती वेअर करू शकता. कॉलेज किंवा ऑफिससाठी हे ड्रेसिंग उत्तम आहे. कंबर बेल्टमुले कंबर अधिक आकर्षक दिसण्यासाठी आणि उंची जास्त दिसण्यासाठी कंबरेला बेल्ट लावावे. यामुळे तुमच्या कमरेखालील भाग उंच दिसतो.




