spot_img

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना तिखट प्रश्न, न्याय न मिळाल्यास जनआंदोलनाची धमकी

spot_img

आत्महत्या नोटमधील गंभीर आरोपांवरून राजकीय वाद तापला; एसआयटीची मागणी आणि पोलिस-खासदारांवर संशयाची सुई

फलटण येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे (Sampada Munde) यांनी हाताच्या तळहाती एका नोटेत खळबळजनक आरोप लिहून आत्महत्या केली. या नोटेत त्यांनी पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा उल्लेख केला आहे. याशिवाय, एका खासदारावरही गंभीर आरोप आहेत. या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, संपदा यांच्या कुटुंबाने एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) ने चौकशी करण्याची मागणी केली आहे, पण अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.

बीड जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी संपदा यांच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. मात्र, ओबीसी समाजाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट प्रश्न विचारले आहेत. हाके यांनी पोस्ट सुरू करताच, “मुख्यमंत्री महोदय, सप्रेम नमस्कार… डॉ. संपदाला न्याय मिळेल का?” असा धाकडा प्रश्न उपस्थित केला. पुढे त्यांनी लिहिले की, महाराष्ट्रात राहण्याची चीड येऊ लागली आहे. “तुमची मुलगी सुरक्षित आहे का? तिला वसतिगृहात ठेवणे कितपत योग्य? अशा असंख्य प्रश्नांनी एका बापाची चिंता वाढली आहे.

डॉ. संपदा तर गेल्या, तिने आत्महत्या केली की नराधमांनी तिचा गळा घोटला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.”हाके यांनी फलटणमधील पोलिस विभाग आणि राजकीय नेत्यांवर संशय व्यक्त करत म्हटले की, ज्या ठिकाणी संशयाची सुई फिरते तिथेच मुख्यमंत्री आले आणि त्या नेत्यांना क्लीन चिट दिली. “महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या मनात प्रचंड संताप आहे. तो खासदार कोण, ज्याने ऊसतोड मजुरांना गुलाम समजून स्वराज चालवले? दहा लाख ऊसतोड मजुरांना महाराष्ट्रात माणूस म्हणून कायद्याचा आधार नाही, असा माझा गृह विभागावर आरोप आहे,” असे ते म्हणाले. ऊसतोड सत्रापूर्वी मुकादम-मजुरांचे अपहरण, मारहाण आणि सातबारा कोरीच्या बाबी संशोधनाचा विषय आहेत, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.डॉ. संपदेचा बळी गेल्याने एसआयटीची स्थापना तातडीने व्हावी, ही मागणी हाके यांनी केली. “आत्महत्या नोट म्हणून हातावर लिहिलेले हस्ताक्षर त्यांचे आहे का? यावर प्रश्नचिन्ह आहे. पीएसआय बदने यांच्याविरुद्ध डीएसपीकडे तक्रार केली तरी कारवाई झाली नाही; झाली असती तर संपदा आज जिवंत असत्या,” असे ते म्हणाले.

या प्रकरणाला जन्म देणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे संपदेच्या डोक्यावर आत्महत्येची वेळ आली आणि जे नेते जबाबदार आहेत ते मोकाट फिरणार का? प्रत्येकदा राजकारण करणार का? आरोपींच्या मुठीत पाठीशी घालणार का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल, अन्यथा न्याय मिळेपर्यंत जनआंदोलन उभे करावे लागेल, अशी धमकी हाके यांनी दिली.”डॉ. संपदा प्रकरण संवेदनशील असताना राजकारण करणे महाराष्ट्राला मान्य नाही. तुम्ही सुज्ञ आहात, प्रत्येक गोष्टीत राजकारण का? आरोपींच्या मुठ्या आवळा. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेल्याची जनभावना आहे,” असे शेवटी हाके यांनी पोस्टमध्ये नमूद केले. हे प्रकरण राजकीय वादात रूपांतरित होत असून, जनतेतून संतापाची लाट उसळत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ