spot_img

Ladki Bahin Yojana eKYC : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत ई-केवायसी अनिवार्य; नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा पुढील हप्ता थांबू शकतो!

spot_img

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते दिवाळीपूर्वी वितरित होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या सरकारने सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केल्याचा कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. पण नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला अनिवार्यता येऊ शकते. म्हणजेच, जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर नोव्हेंबरचा आणि त्यानंतरचे हप्ते थांबू शकतात.

अनेक लाभार्थींना ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत . पोर्टलवर लॉगिन, अपलोडिंग आणि ओटीपी पडताळणीसंबंधी त्रुटी वारंवार दिसत आहेत. तरीही शासनाने दोन महिन्यांचा अवधी दिला आहे, त्यामुळे महिलांना या काळात प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी आहे.

ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थींनी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि पुढील पद्धतीने प्रक्रिया करावी:

  1. पोर्टलवर लॉगिन करून “e-KYC” पर्याय निवडा.
  2. आधार क्रमांक व कॅप्चा टाका आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा.
  3. आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP भरून ‘Submit’ करा.
  4. नंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरा.
  5. जात प्रवर्ग निवडा, घोषणापत्रावर क्लिक करा आणि माहिती पडताळून ‘Submit’ करा.

ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर “e-KYC Verification Successful” असा संदेश स्क्रीनवर दिसेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ