spot_img

krishnaraj Mahadik : सोशल मीडिया स्टार ते ‘युवा मोर्चा’चा सारथी!

spot_img

भाजपच्या नव्या कार्यकारिणीत नव्या दमाच्या शिलेदारांना संधी; व्लॉगर कृष्णराज यांच्यावर मोठी जबाबदारी

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीचा पत्ता खोलला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत त्यांनी जुन्या-जाणत्या नेत्यांसोबतच अनेक ‘फ्रेश’ चेहऱ्यांवर विश्वास टाकला आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी नाव ठरले आहे ते म्हणजे कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक, ज्यांच्याकडे आता भाजप युवा मोर्चाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

कोण आहेत कृष्णराज महाडिक?

कृष्णराज हे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत. मात्र, त्यांची ओळख केवळ ‘खासदारांचा मुलगा’ एवढीच मर्यादित नाही. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कृष्णराज हे एक लोकप्रिय युट्यूबर असून ७ लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात. त्यांच्या व्लॉग्सच्या माध्यमातून ते तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. अवघ्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकणारे कृष्णराज यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र ऐनवेळी पक्षीय धोरणामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. आता त्याच निष्ठेचे फळ म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली आहे.

चव्हाणांची ‘नवी रणनीती’ –

रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष जनसंपर्क असलेल्या तरुणांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. भाजपमध्ये युवा मोर्चाचे अध्यक्षपद हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते, कारण आजचे अनेक दिग्गज नेते याच पदावरून पुढे आले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ