Kolhapur News : गुजरात व्यापाऱ्यांचा धक्कादायक निर्णय; कोल्हापूर-सांगलीच्या गुळावर बहिष्कार

spot_img

कोल्हापूर आणि सांगली येथून येणाऱ्या गुळाबाबत गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ठराविक तारखेनंतर या भागातील गुळाची खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गुळ उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सध्या परिस्थिती अशी आहे की, दिलेल्या मुदतीपूर्वी शक्य तितका गुळ गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्याची घाई सुरू झाली आहे. व्यापारी आणि उत्पादक दोघेही नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

या निर्णयामागचे प्रमुख कारण म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत काही गुळाच्या नमुन्यांमध्ये घातक रसायनांचे अंश आढळल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संभाव्य जोखीम टाळण्यासाठी गुजरातमधील व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. आधीच गुळाला योग्य दर मिळत नसताना या नव्या घडामोडीमुळे शेतकरी आणि उत्पादकांवर आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ