कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) निवडणुकीमध्ये महायुतीला पहिला झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 12 क मध्ये अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ महायुतीवर येणार आहे. या प्रभागात महायुतीचा उमेदवारच शिल्लक राहिलेला नाही. प्रभाग क्रमांक 12 ‘ब’ मध्ये महायुतीच्या दोघा उमेदवारांनी अर्ज केल्याने घोळ केल्याने प्रभाग 12 क मध्ये महायुतीचा उमेदवारच राहिलेला नाही. त्यामुळे अपक्षाला पुरस्कृत करावा लागणार आहे. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे. भाजप 36 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना शिंदे 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाला 15 जागा देण्यात आले आहेत.माजी नगरसेवक इंद्रजित उर्फ जितू सलगर यांनी प्रभाग क्र. 12 मधून उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी नगरसेवक जितू सलगर यांचे आभार मानेल. भविष्यात महायुतीकडून योग्य तो सन्मान केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.
धनश्री तोडकर यांनी म्हटलं होतं की, मी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे करत आहे. काही महिन्यापूर्वी माझे पती सचिन तोडकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर स्वतःला सावरून पक्षाचा एकही कार्यक्रम किंवा एकही बैठक चुकवली नाही. कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा मोठे कार्यक्रम मी एकटी महिला असून घेतले, पण आज माझी आर्थिक परिस्थिती नाही. या कारणामुळे पक्ष मला तिकीट नाकारत आहे. मी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असल्याने पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्याने माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने आत्मदहन करणार असल्याचे म्हटले होते.




