Kishori Pednekar : मुंबईच्या शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचा प्रस्ताव; किशोरी पेडणेकर यांच्या प्रस्तावाला AIMIM चा विरोध

spot_img

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील प्रमुख नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रस्तावावर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, AIMIM पक्षाने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेत, शाळांमध्ये धर्माशी संबंधित गोष्टी लादण्याऐवजी संविधानावर आधारित शिक्षण दिले जावे, अशी मागणी केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की ‘मनाचे श्लोक’ हे कोणत्याही एका धर्माशी संबंधित नसून विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि चारित्र्य विकासासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे त्याला धार्मिक रंग देणे योग्य नाही.

दरम्यान, या प्रस्तावावर 9 तारखेला BMC मध्ये सविस्तर चर्चा होणार असल्याचे समजते. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार आणि या वादाला कोणते वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ