spot_img

Karuna Munde : परळीतील नकली दारू आणि खंडणीच्या धंद्यांवर, वाल्मीक कराडला पाठबळ देण्याचा करुणा शर्मांचा आरोप

spot_img

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकत्याच बोधेगाव येथील एका विकासकाम लोकार्पण सोहळ्यात आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि संकटांबद्दल खंत व्यक्त केली होती. “मी कोणताही गुन्हा केला नाही, तरी मला शिक्षेला सामोरं जावं लागलं. मंत्रिपदाचा आनंदही घेता आला नाही,” असं सांगत त्यांनी मनातील वेदना मांडली होती. मात्र, त्यांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी सणसणीत प्रत्युत्तर देत मुंडेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.करुणा शर्मा यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करताना म्हटलं, “तू गुन्हा केला नसशील, पण तुझ्या मंत्रिपदाच्या छत्रछायेत वाल्मीक कराडसारखे गुंड बीडमध्ये उच्छाद मांडत होते. तुझ्या कारखान्यांपासून ते सर्व व्यवसायांपर्यंत कराडची उपस्थिती होती.

एका साध्या घरकामगाराला तुझ्या पाठबळामुळे ‘गुंड’ बनण्याची संधी मिळाली. तुझ्या मंत्रिपदाच्या जोरावरच त्याच्यासारखे लोक मोठे झाले.” शर्मा यांनी परळी आणि बीडमध्ये खंडणी, जमीन बळकावणे, नकली दारूसारखे बेकायदा धंदे मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून चालत असल्याचा आरोप केला.“वाल्मीक कराडची खरी लायकी काय होती? तो तुझी सावलीच होता. तुझ्याच पाठिंब्याने बीड आणि परळीमध्ये गुंडांची टोळी तयार झाली,” असं म्हणत शर्मांनी मुंडेंना खडेबोल सुनावले. “व्हाईट कॉलर बनून मोठमोठी भाषणं देणं सोपं आहे, पण आता हे चालणार नाही. मी आहे, आणि हा सगळा प्रकार उघड करणार,” असा इशारा त्यांनी दिला.

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात मुंडेंचा थेट हात नसला तरी त्यांच्या मंत्रिपदाच्या बळावर गुंडांना प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप शर्मांनी केला. “परळीत नकली दारूमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली, महिला विधवा झाल्या. आणि तू म्हणतोस तुझी चूक नाही? सगळ्यात मोठी चूक तुझीच आहे,” असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.या आरोपांमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, धनंजय मुंडे यांच्यावर निर्माण झालेल्या या वादळाचं पडसाद काय असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ