ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या टॉक शोमध्ये करण जोहरने सांगितलं खरं-खोटं, नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण
‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ (‘Too Much with Kajol and Twinkle’) हा लोकप्रिय टॉक शो सध्या चांगलाच गाजतोय. अभिनेत्री काजोल (Kajol) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांच्या या शोमध्ये सेलिब्रिटींच्या मुलाखतींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) यांनी हजेरी लावली. यावेळी करणने आपल्या खासगी आयुष्याबद्दल एक खळबळजनक खुलासा करत सर्वांना चकित केलं. ‘खरं किंवा खोटं’ या मजेदार सेगमेंटमध्ये करणला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य आणि एक खोटं सांगण्यास सांगितलं गेलं. त्यावर करणने सांगितलं, “मी वयाच्या 26 व्या वर्षी माझी व्हर्जिनिटी गमावली आणि जान्हवी, तुझ्या कुटुंबातील एका व्यक्तीसोबत मी जवळीक साधली होती.” हे ऐकून ट्विंकल, काजोल आणि जान्हवी यांना धक्काच बसला.करण पुढे म्हणाला, “मी त्या पार्टीला उशिरा पोहोचलो होतो आणि तुझ्या कुटुंबातील कोणाशीही मी जवळीक साधली नव्हती, पण माझ्या मनात तो विचार अनेकदा आला होता.” करणच्या या दोन विधानांपैकी नेमकं काय खरं आणि काय खोटं, याचा अंदाज आता नेटकरी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या खुलाशाने सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आलं आहे.
जान्हवी कपूर आणि करण जोहर यांचे व्यावसायिक संबंधही या शोमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. 2018 मध्ये जान्हवीने करणच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने करणच्या निर्मिती संस्थेसोबत काम केलं आहे. यामुळे करण आणि कपूर कुटुंबातील जवळीक स्पष्ट होते.करण जोहर 2017 मध्ये सरोगसीद्वारे यश आणि रुही या जुळ्या मुलांचा पिता बनला. आपल्या मुलांच्या संगोपनाबाबत आणि एकल पालकत्वाबाबत करण अनेकदा मोकळेपणे बोलतो. त्याच्या आई हिरू जोहर यांच्यासोबत तो आपल्या मुलांचा सांभाळ करतो. या शोमधील करणचा हा खुलासा आणि त्याच्या खट्याळ शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच, पण नेटकऱ्यांना विचार करायलाही भाग पाडलं आहे.




