spot_img

Kapil Dev : गौतम गंभीर कोच नव्हे, मॅनेजरच! कपिल देवांनी मॉर्डन क्रिकेटमधील कोचिंगवर मांडले मत

spot_img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर गंभीर यांच्या भूमिकेवर प्रश्न; “एलिट खेळाडूंना पारंपारिक कोचिंगची गरज नाही” – कपिल देव

भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी आधुनिक क्रिकेटमधील ‘हेड कोच’ या संकल्पनेवर मोठी चर्चा सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टेस्ट मालिकेत भारताला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गौतम गंभीर यांच्या भूमिकेबाबत दबाव वाढलेला असतानाच कपिल देव यांनी परखड मत मांडलं आहे.

कपिल देव यांच्या मते, आजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेड कोचची भूमिका पारंपारिक अर्थाने उरलेली नाही. “गौतम गंभीर कोच म्हणून नव्हे, तर मॅनेजर म्हणून अधिक योग्य ठरतील,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये बोलताना त्यांनी तळागाळातील कोचिंग आणि उच्च पातळीवरील टीम मॅनेजमेंटमधील फरक स्पष्ट केला.

कपिल देव म्हणाले की, शाळा-कॉलेज स्तरावर खेळाडूंना तांत्रिक गोष्टी शिकवणारे कोच आवश्यक असतात. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आधीच सर्वोच्च क्षमतेचे असतात. “अशा खेळाडूंना हेड कोच नेमकं काय टेक्निकल शिकवणार? लेग स्पिनर किंवा विकेटकीपरला गंभीर कसं कोचिंग देणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गंभीर यांच्या कोचिंग पद्धती, खेळाडूंची अदलाबदल आणि पार्ट-टाइम पर्यायांवर असलेला भर यामुळे रणनितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं अप्रत्यक्षपणे त्यांनी सूचित केलं. कपिल देव यांच्या मते, हेड कोचची खरी जबाबदारी म्हणजे व्यक्ती व्यवस्थापन, खेळाडूंना आत्मविश्वास देणं आणि संघात सकारात्मक वातावरण निर्माण करणं. “खेळाडूंना ‘तू हे करू शकतोस’ असा विश्वास देणं फार महत्त्वाचं आहे. मॅनेजर किंवा कॅप्टन म्हणून तरुण खेळाडू तुमच्याकडे पाहतात. टीममध्ये सगळ्यांना सहज आणि सुरक्षित वाटलं पाहिजे,” असं मत कपिल देव यांनी मांडलं.

एकूणच, मॉर्डन क्रिकेटमध्ये कोच म्हणजे शिक्षक नसून प्रभावी मॅनेजर असावा, ही स्पष्ट भूमिका कपिल देव यांनी मांडत भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ