कांताराने आठव्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
कांतारा चित्रपट जगभरात ४०० कोटीची कमाई करणारा ऑलटाइम ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. हा चित्रपट फक्त १५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केला आहे. कांतारा चित्रपटाच्या यशानंतर, कांतारा चॅप्टर 1 (Kantara Chapter 1) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्याही भूमिका आहेत.या चित्रपटाने सुद्धा संपूर्ण भारतातील प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला होता. निसर्गाच्या सानिध्यात राहणारे,त्याची राखण करत देव म्हणून पूजा करणारे, त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या देवाची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty) ‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 2022 च्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’ चा सिक्वेल बनवण्यासाठी ऋषभ शेट्टीनं तीन वर्षे घालवली. ‘कांतारा चॅप्टर 1’ चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले असून मुख्य भूमिकेत देखील तो झळकला आहे. चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा गल्ला जमावला आहे.
‘कांतारा चॅप्टर 1 मध्ये 5,000 वर्षांहून अधिक काळाच्या आणि जवळजवळ विसरलेल्या दंतकथांवर आधारित एक अनोखी कथा होती. जिने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.म्हणूनच ‘कांतारा’चं कलेक्शन सातत्यानं वाढतंय. आतापर्यंत चित्रपटांच्या कलेक्शनवर एक नजर टाकली. तसेच, आठव्या दिवशी चित्रपटानं कितीचा गल्ला केला? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘कांतारा चॅप्टर 1 चं बॉक्स ऑफिसवर झालेले कलेक्शन पुढीलप्रमाणे –
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटानं गेल्या आठ दिवसांत दररोज धमाकेदार कमाई केली आहे. खाली देण्यात आलेला डेटा स्ट्रीमलिंकवर आधारित आहे.
दिवस पहिला 61.85 कोटी
दिवस दूसरा 45.4 कोटी
दिवस तिसरा 55 कोटी
दिवस चौथा 63 कोटी
दिवस पाचवा 31.5 कोटी
दिवस सहावा 34.25 कोटी
दिवस सातवा 25.25 कोटी
दिवस आठवा 20.50 कोटी
एकूण 334.94 कोटी




