spot_img

Kajalmaya : अवघ्या तीन महिन्यांत ‘काजळमाया’चा पडदा पडणार, स्टार प्रवाहवर नवी मालिका सज्ज

spot_img

11 जानेवारीला अंतिम भाग, रात्री 9 वाजता ‘तुझ्या सोबतीने’चा नवा प्रवास सुरू

छोट्या पडद्यावर काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात, तर काही मालिका अपेक्षित टीआरपी आणि प्रतिसाद न मिळाल्यामुळे अल्पावधीतच बंद पडतात. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘काजळमाया’ या मालिकेबाबत असंच चित्र दिसून येत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेली ही मालिका केवळ तीन महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘काजळमाया’ या मालिकेत वंशामधील विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत निपुण असलेल्या पर्णिका या चेटकीणीची रंजक कथा दाखवण्यात आली होती. या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर आणि नवोदित अभिनेत्री रुची जाईल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सुरुवातीला वेगळ्या विषयामुळे चर्चेत आलेल्या या मालिकेला मात्र अपेक्षित यश मिळालं नाही.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्टार प्रवाहवर काही नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली असून, त्याच पार्श्वभूमीवर ‘काजळमाया’ बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘तुझ्या सोबतीने’ ही नवी मालिका लवकरच रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे याच वेळेतील ‘नशीबवान’ मालिका बंद होणार अशी चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात ‘काजळमाया’चा प्रवास संपणार आहे.

दरम्यान, ‘काजळमाया’चा शेवटचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये वालावलकर घराणं शापातून मुक्त होत असून, पर्णिका आणि कनकदत्ता या दोन्ही चेटकिणींचा कायमचा अंत दाखवण्यात आला आहे. “पर्णिका आणि कनकदत्ताचा होणार कायमचा अंत – अंतिम भाग” असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

‘काजळमाया’ ही मालिका येत्या 11 जानेवारी रोजी अंतिम भागासह प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानंतर रात्री 9 वाजता ‘तुझ्या सोबतीने’ ही नवी मालिका सुरू होईल. मात्र ‘नशीबवान’ या मालिकेच्या बदललेल्या वेळेबाबत अद्याप स्टार प्रवाहकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ