spot_img

Jui Gadkari : “प्लिज,मदत करा…”अभिनेत्री जुई गडकरींची राजकारण्यांना थेट साद

spot_img

मढ आयलंडच्या रस्ते व ट्रॅफिकच्या प्रश्नावर जुईचा संताप; 3.5 वर्षांपासून सुरू असलेल्या त्रासावर सोशल मीडियातून आवाज

‘ठरलं तर मग’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. केवळ कामापुरतंच नाही, तर अनेक सामाजिक प्रश्नांवरही ती निर्भीडपणे भूमिका मांडताना दिसते. नुकतीच जुईनं शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असून, या पोस्टमधून तिनं महाराष्ट्रातील राजकारण्यांसमोर अक्षरशः हात जोडत मदतीची विनंती केली आहे.

नेमकं असं काय घडलं की जुईला ‘प्लिज प्लिज हेल्प करा’ असं म्हणावं लागलं?

जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेचं चित्रीकरण मढ आयलंड येथे करत आहे. मात्र, या ठिकाणी दररोज शूटिंगसाठी जाणं जुईसह संपूर्ण टीमसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.रस्त्यांची दयनीय अवस्था आणि प्रचंड ट्रॅफिक यामुळे कलाकारांचा संयम सुटत चालला आहे.

जुईनं मढ आयलंडकडे जाणाऱ्या रस्त्याचा व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला. गेल्या 3.5 वर्षांपासून या परिसरात रस्त्याचं काम सुरू असून, ते कधी पूर्ण होणार याचा पत्ता नाही, असं तिनं म्हटलं आहे. रोज नवे खड्डे, नवा त्रास आणि त्यातच अक्सा बीच परिसरात सुट्टीच्या दिवशी वाढणारी गर्दी ट्रॅफिक अधिकच जीवघेणा बनवते, असंही जुईनं नमूद केलं.तिनं आपल्या पोस्टमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की, इथे एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काय करायचं? मुंबई आणि ठाण्यातील आधीच बेशिस्त ट्रॅफिक पार करून मढ आयलंडला पोहोचायचं आणि तिथे पुन्हा तासन्‌तास अडकायचं, हा रोजचा अनुभव असल्याचं जुई सांगते.

“फक्त 10 किलोमीटरचा रस्ता तयार व्हायला साडेतीन वर्षं लागतात, हे कसं शक्य आहे? असा थेट सवाल करत जुईनं सामान्य नागरिकांच्या वेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. नियम पाळून, वेळेवर कर भरूनही जर अशीच ‘सुविधा’ मिळत असेल, तर नागरिकांनी काय अपेक्षा ठेवायची, असा प्रश्नही तिनं उपस्थित केला. पोस्टच्या शेवटी जुईनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापालिकेला टॅग करत थेट मदतीची मागणी केली आहे. “प्लिज, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे… प्लिज हेल्प करा,” अशा भावनिक शब्दांत जुईनं आपली साद घातली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ