राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात बहरीनमध्ये पार पडणार आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये पार पडणार असून या समारंभासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती समोर आली आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे.

पवार कुटुंबीयांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.

जय पवारांचा बहरीनमध्ये लग्नसोहाळ पार पडणार आहे. यात चार दिवसांचे पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 4 डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आहे.

या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

विवाह सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.

जय पवार हे अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला होता.

पवार कुटुंबीयांचा हा परदेशातील विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे.




