spot_img

Jay Bhanushali Divorce : जय भानुशालीकडून माहीने मागितली ‘इतक्या’ कोटींची पोटगी?

spot_img

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली (Jai Bhanushali) आणि माही विज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या दोघांना तीन मुलं असून त्यापैकी दोघांना त्यांनी दत्तक घेतलं होतं. घटस्फोटानंतरही तिन्ही मुलांचं संगोपन दोघं मिळून करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. यादरम्यान माहीने जयकडून कोट्यवधी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर माहीने तिच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग पोस्ट करत उत्तर दिलं आहे. माहीने जयकडे पाच कोटी रुपयांची पोटगी मागितल्याची चर्चा होती. परंतु या चर्चा खोट्या असल्याचं माहीने स्पष्ट केलं आहे.

“अर्धवट माहितीमधून गोष्टी पसरवू नका. माहीने जयकडून पोटगी म्हणून 5 कोटी रुपये घेतले, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. फक्त लाइक्स आणि कमेंट्ससाठी आमच्या जुन्या मुलाखती काढून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. हे खूपच दु:खद आहे. मला मान्य आहे की आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्यामुळे लोकांना आमच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. पण हे सर्व करण्याची गरज नाही. घटस्फोटानंतर मी काहीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं तरी त्याचा संबंध जयशी जोडला जातोय. 14 वर्षांच्या संसारानंतर आम्ही घटस्फोट का घेतला, यामागचं कारण लोकांना माहीतसुद्धा नाही. तरीही त्यावर टिप्पण्या दिल्या जात आहेत,” अशा शब्दांत माहीने राग व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ