अंशुला कपूरच्या साखरपुड्यात जान्हवीची धमाल; शिखरसोबतच्या नात्यावरील चर्चांना पुन्हा उधाण
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत नवीन चर्चा रंगत असतात. अलीकडेच सावत्र बहीण अंशुला कपूर हिच्या साखरपुड्यात जान्हवीने रंगतदार एंट्री केली आणि कार्यक्रमात मस्त धमाल केली. या सोहळ्यात तिचा कथित प्रियकर शिखर पहाडिया देखील उपस्थित होता. कपूर परिवारातील जवळपास प्रत्येक कार्यक्रमात त्याची उपस्थिती आता नेहमीचीच झाली आहे.
अलिकडेच बोनी कपूर (Bonny Kapoor) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या खासगी पार्टीतही शिखर (Shikhar Pahadiya) कुटुंबासोबत पुरेपूर वेळ घालवताना दिसला. काही दिवसांपूर्वी तो बोनी कपूर यांच्या सोबतच विमानतळावरही दिसला होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilumar Shinde) यांचा नातू आणि खासदार प्रणिती शिंदे यांचा भाचा असलेला शिखर पहाडिया मोठ्या संपत्तीचा वारसदार म्हणून ओळखला जातो.
दरम्यान, जान्हवी आणि शिखर लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच जान्हवीने दिलेल्या नव्या मुलाखतीने उत्सुकता आणखी वाढवली आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारले असता जान्हवीने सांगितले की,
“मी सध्या आयुष्यात खूप आनंदी आहे. पण ज्यांचे नाव तुम्ही घ्याता, त्यांच्याकडे आणि माझ्याकडे वेळच नाही.”
नाव घेण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या जान्हवीला पत्रकारांनी थेट विचारले नाव घेण्यास काय अडचण? यावर ती हसत म्हणाली, “नको रे… मग हेडलाईन बनते! नाव तर मी अनेकदा घेते.”
“जस्सी” म्हटल्यावर तिने मिश्किलपणे प्रतिसाद देत, “जस्सी? जान्हवी आणि शिखर म्हणताना ‘जानवर’ सारखं वाटतं… मला आवडत नाही!” असेही म्हणाली.
शिखराबद्दल प्रश्न विचारले की ती थोडी संकोचलेली जाणवत होती. “असं काही विचारलं की मी वेगळीच होते… उत्तर देणं कठीण जातं,” असं म्हणत जान्हवीने विषय हलक्याफुलक्या अंदाजात टाळला.
या मुलाखतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जान्हवी आणि शिखर जवळपास प्रत्येकवेळी एकत्र दिसत असल्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.




