spot_img

Jain Initiation : स्वामीनारायण मंदिरात सात उच्चशिक्षित तरुणांनी घेतली दीक्षा !

spot_img

करोडोंच्या संपत्तीचा त्याग करून घेतली दीक्षा

जैन धर्मातील दीक्षा (Jain initiation) घेणे म्हणजे सर्व भौतिक सुखसोयींचा त्याग करणे आहे. दीक्षा घेणाऱ्यांना तपस्वीचे जीवन जगावे लागते. जैन धर्मात याला ‘चरित्र’ किंवा ‘महानिभिश्रमण’ असेही म्हणतात. दीक्षा घेतल्यानंतर अंहिसा, सत्य बोलणे, ब्रम्ह्यचार्य पालन, अस्तेय म्हणजे लालच न करणे, अपरिग्रह म्हणजे गरजेइतकेच संचय करणे यांचे पालन करावे लागते. भिक्षा मागून जीवन जगावे लागते. सूती कपडे परिधान करावे लागतात. पायीच प्रवास करावा लागतो. दीक्षा घेताना आपल्या डोक्यावरील केस स्वत:च्या हाताने ओढून काढावे लागतात. त्यानंतर दीक्षा घेण्याचा क्रम पुर्ण होतो.

सात तरुणांनी नुकतीच साधू होण्यासाठी दीक्षा घेतली. गुजरातची राजधानी गांधीनगरमधील स्वामीनारायण मंदिर (Swaminarayan Temple) वासना संस्थेत दीक्षा समारंभ पार पडला. जैन धर्मात आणि स्वामीनारायण पंथाचे अनुयायी लोकांमध्ये सांसारिक सुखांचा त्याग करून दीक्षा घेऊन साधू बनणे सामान्य आहे. हा कार्यक्रमही त्याला अपवाद नव्हता. या समारंभात सीए, एमबीए आणि आयटी अभियंते यांसारख्या उच्चशिक्षित तरुणांनी दीक्षा घेतली. दीक्षा घेतलेल्या तरुणांपैकी एक त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्या कुटुंबाची एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे. हे कुटुंब मुंबईचे आहे. दीक्षा घेतलेल्या सात तरुणांपैकी तीन तरुण त्यांच्या कुटुंबातील एकुलती एक मुले आहेत. त्यापैकी दोघे श्रीमंत कुटुंबातील आहेत. या तरुणांनी एसएमव्हीएस प्रशिक्षणार्थी केंद्रात पाच वर्षांचा सखोल आध्यात्मिक अभ्यास पूर्ण केला. येथे, त्यांना “मी कोण आहे?” या प्रश्नापासून ते १५ दिवसांच्या मौन ध्यानापर्यंतचे अनोखे प्रशिक्षण मिळाले. “माझे कुटुंब खूप श्रीमंत आहे. माझ्या वडिलांचा १२०० कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. मी २१ वर्षांचा होईपर्यंत कुटुंबाच्या व्यवसायात होतो. पण मला वाटले की साधूचा मार्ग विलासी जीवनापेक्षा चांगला आहे.” – माध्यमांच्या एका भागात दसत्व भगत यांचे म्हणणे उद्धृत करण्यात आले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ