spot_img

Jacqueline Fernandez : ख्रिसमसला सुकेशचे नवे प्रेमपत्र; ‘बेव्हरली हिल्समधील लव्ह नेस्ट’ची जॅकलिनला भेट असल्याचा दावा

spot_img

तिहार तुरुंगातून पुन्हा एकदा पत्र, ट्रम्पच्या मार-ए-लागोशी बंगल्याची तुलना; जॅकलिनने मात्र न्यायालयात घेतला आक्षेप

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraSekhar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तुरुंगात असतानाही अभिनेत्री आणि कथित गर्लफ्रेंड जॅकलिन फर्नांडिससाठी (Jacqueline Fernandez) प्रेमपत्र लिहिण्याची त्याची मालिका कायम असून, आता ख्रिसमसच्या निमित्ताने त्याने आणखी एक पत्र पाठवल्याचा दावा समोर आला आहे.

या पत्रात सुकेशने जॅकलिनला ख्रिसमसच्या शुभेच्छा देत अमेरिकेतील बेव्हरली हिल्स या अतिशय पॉश भागात असलेला एक आलिशान बंगला तिला भेट दिल्याचं म्हटलं आहे. या बंगल्याला त्याने ‘द लव्ह नेस्ट’ असं नाव दिलं असून, हे घर त्याने खास जॅकलिनसाठी बांधल्याचा दावा केला आहे. पूर्वी हे घर कधीच पूर्ण होणार नाही, असं जॅकलिनला वाटत होतं, मात्र आता ते पूर्ण करून ख्रिसमसला भेट देत असल्याचं त्याने पत्रात नमूद केलं आहे.

सुकेशने या बंगल्याचं वर्णन करताना तो अपेक्षेपेक्षा अधिक भव्य आणि सुविधांनी युक्त असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर या घराच्या परिसरात स्वतःचा १९ होलचा गोल्फ कोर्स असल्याचाही त्याने दावा केला आहे.

पत्रात पुढे सुकेशने या बंगल्याची तुलना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध ‘मार-ए-लागो’ रिसॉर्टशी केली आहे. आपलं ‘लव्ह नेस्ट’ पाहून ट्रम्पनाही हेवा वाटेल, असं त्याने गंमतीच्या स्वरात म्हटलं आहे.

दरम्यान, जॅकलिन फर्नांडिसचं नाव डिसेंबर २०२१ मध्ये या मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आलं होतं. ईडीच्या चौकशीत तिची अनेकदा विचारपूस झाली असून, सुकेशकडून तिला महागड्या भेटवस्तू मिळाल्याचे आरोप झाले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, सुकेशकडून सातत्याने येणाऱ्या पत्रांवर जॅकलिनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करत, या पत्रांमुळे मानसिक त्रास होत असल्याचं सांगून सुकेशला पत्र पाठवण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ