spot_img

Israel vs Iran War : इराण-इस्रायल युद्धावरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

spot_img

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला आहे. शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्रायलने अमेरिकाच्या मदतीने इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर तेहरानकडून तातडीने प्रत्युत्तर देत पश्चिम आशियातील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हवाई कारवाईदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, मोदी नुकतेच इस्रायल दौऱ्यावरून परतले आणि त्यानंतर लगेचच युद्ध भडकले, हा केवळ योगायोग मानता येणार नाही. मोदींचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले.

राऊत म्हणाले की, इराण हा भारताचा दीर्घकालीन मित्र देश आहे आणि काश्मीर प्रश्नावर त्याने भारताला पाठिंबा दिला होता. तसेच भारताला स्वस्त दरात तेलही पुरवले. अशा परिस्थितीत भारताने या युद्धावर स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जर अमेरिका भारत-पाकिस्तान तणावात हस्तक्षेप करू शकते, तर भारताचे नेतृत्वही या संघर्षात मध्यस्थी करू शकते. भारताचे परराष्ट्र धोरण नेमके काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या युद्धामुळे भू-राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि त्याचा भारतावर मोठा परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राऊत यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या कारवाईमुळे जागतिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी भारताने ‘विश्वगुरू’ असल्याचा दावा करत ठोस भूमिका घ्यावी आणि युद्ध रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ