spot_img

Israel vs Iran Conflict : आखाती देशांतील युद्धधुमसचक्रीत अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट संनियंत्रण

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या तणावामुळे आखाती देशांतील विमान वाहतूक विस्कळीत झाली असून, दुबईसह इतर शहरांत महाराष्ट्रातील शेकडो नागरिक अडकून पडले आहेत. या संकटकाळात आपल्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांत अडकलेल्या मराठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार केंद्र सरकार आणि विविध आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी सतत संपर्कात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतकार्याच्या समन्वयाची जबाबदारी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे. विशेष म्हणजे, दुबईतील ‘इंडियन पीपल्स फोरम’च्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने एक विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. ज्या प्रवाशांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदतीची गरज आहे, त्यांनी तात्काळ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही प्रवासी काल रात्री मुंबईत सुखरूप परतले असले, तरी अजूनही अनेक नागरिक तिथे अडकलेले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने या नागरिकांच्या निवास, भोजन आणि परतीच्या प्रवासाचे नियोजन केले जात आहे. “आमचे सरकार प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि सर्वांना सुरक्षितपणे भारतात आणले जाईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. युद्धसदृश वातावरणात अडकलेल्या आपल्या माणसांसाठी राज्य सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत दिलासादायक ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ