spot_img

Israel Iran US War : खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी सांगताना अँकर भावुक; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

spot_img

इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त कारवाईत त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यानंतर देशभर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, एका सरकारी टीव्ही चॅनेलवरील अँकरचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये अँकर अधिकृत बातमी वाचताना भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. बातमी सांगताना त्याचे डोळे पाणावतात, शब्द अडखळतात आणि काही क्षण तो थांबून रडू लागतो. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, तो खामेनेई यांना देशासाठी मजबूत नेतृत्व मानत होता, त्यामुळे त्यांच्या निधनाचा त्याच्यावर खोल परिणाम झाला.

या घटनेनंतर इराण सरकारने देशात ७ दिवसांची सार्वजनिक सुट्टी आणि ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात खामेनेई यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामध्ये त्यांची मुलगी, जावई आणि नातवंडाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच संरक्षणमंत्री, वरिष्ठ राजकीय नेते आणि सैन्य अधिकारी यांचाही मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

या हल्ल्यामुळे देशात केवळ राजकीय नव्हे तर मानवी संकट निर्माण झाल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, खामेनेई यांच्या निधनानंतर इराणच्या लष्करी आणि सुरक्षा यंत्रणा विशेषतः इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. राजधानी तेहरानमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून जगातील अनेक देशांनी आपल्या दूतावासांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, वॉशिंग्टन डी.सी.मध्ये काही इराण-अमेरिकी समुदायातील सदस्यांनी या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याने वातावरण अधिक संवेदनशील बनले आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे जागतिक राजकारणात तणाव वाढला असून, पुढील काळात त्याचे व्यापक परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ