संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्या वादावरही घटनेचे केले स्पष्टीकरण
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman khan) त्याच्या खासगी आयुष्यामुळे काहीकाळी तो प्रचंड चर्चेत राहिला.सलमान खान आणि ऐश्वर्या राय (Aishwariya Rai) यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्याच असतील. त्या दोघांनी एकमेकांना काही वर्ष डेट देखील केलं होतं. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम देखील होतं. मात्र काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. सलमान ऐश्वर्याच्या सेट वर जाऊन मारहाण करत असल्याच्या चर्चांना उधाण देखील आले होते. काही काळानंतरच ऐश्वर्या आणि सलमानचा ब्रेकअप झाला. मात्र अनेक वर्ष्यानंतर आता या दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा झाला आहे.सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल अगदी जवळच्या एका व्यक्तीने एक मोठा खुलासा केला संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. संजय लीला भन्साळी (Sanjay leela bansali) आणि सलमान खान यांच्या वादावरही घटनेचे सविस्तर स्पष्टीकरण त्याने केले.
भन्साळी यांच्या सोबत सलमान खानने ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केल होत. या चित्रपटात ऐश्वर्या राय सुद्धा होती. ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपर – डुपर हिट पण झाला होता. भन्साळींनी देवदास चित्रपटात सलमान खानला घेतले नाही आणि त्याच्या ऐवजी शाहरुख खानला घेतले. विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी म्हटले की, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट हीट ठरल्यानंतरही सलमान खान आणि भन्साळी यांच्यात भांडण होत होते’.
‘भन्साळींनी देवदास चित्रपटामध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला लीड ऍक्टरसाठी कास्ट केलं. तो मोठा आश्चर्याचा धक्का सलमानला बसला होता. त्यावेळीच ऐश्वर्या आणि सलमान यांच्या ब्रेकअपबद्दल सगळीकडे चर्चा सुरू होती आणि बातम्यांमध्ये सुद्धा त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. ऐश्वर्या आणि सलमान यांच्या ब्रेकअप नंतर आम्हालाही मोठा धक्का बसला आणि वाईट वाटले. ते दोघे खूप जास्त जवळ होते. मला वाटते की, त्यांनी भांडायला नव्हते पाहिजे.पण सगळं झालं तो भूतकाळ होता. सलमान ही विवेकशील आहे, तो ही यावर कधीच काही बोलत नाही. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले ब्रेकअप आहे. सलमान खान सोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने काही वर्षात अभिषेक बच्चन(Abhisheek bacchan)यांच्याशी लग्न केले. आता दोघेही आपापल्या आयुष्यात खुश आहे’.




