spot_img

Iran’s Drone Attack On Azerbaijan Airport : इराण-इस्राईल युद्धाचा भडका आता अझरबैझानपर्यंत; ड्रोन हल्ल्याने खळबळ!

spot_img

पाकिस्तानच्या मित्रराष्ट्राला इराणने केले टार्गेट: नखचिवन विमानतळावर भीषण हल्ला

इस्राईल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या सहाव्या दिवशी इराणने युद्धाची व्याप्ती वाढवत आता अझरबैझानवर ड्रोन हल्ला चढवला आहे. ५ मार्च २०२६ रोजी गुरुवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात इराणने अझरबैझानच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या नखचिवन आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले. इराणच्या हद्दीतून डागण्यात आलेल्या दोन ड्रोनपैकी एकाने विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगला धडक दिली, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान होऊन तिथे आग लागली. तर दुसरा ड्रोन शेखराबाद गावातील एका शाळेजवळ कोसळला. या भीषण हल्ल्यात दोन सामान्य नागरिक जखमी झाले असून पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. इराणने यापूर्वी कतार आणि सौदी अरेबियातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले होते, मात्र आता अझरबैझानवर हल्ला करून एक नवीन युद्ध आघाडी उघडली आहे.

अझरबैझानने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा उघड भंग असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अझरबैझानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना पाचारण केले आणि या कृत्याबद्दल जाब विचारला आहे. विशेष म्हणजे, अझरबैझान हा पाकिस्तानचा खंदा समर्थक असून काश्मीर मुद्द्यावर नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेत असतो. अलिकडेच अझरबैझानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानचा दौरा केला होता, ज्यामुळे तुर्की, पाकिस्तान आणि अझरबैझान यांची त्रिकोणी युती अधिक घट्ट झाली होती. आता इराणने थेट अझरबैझानला लक्ष्य केल्यामुळे दक्षिण कॉकेशस या संवेदनशील भागात तणाव शिगेला पोहोचला असून, या प्रादेशिक संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ