spot_img

Iran War Update : युद्धग्रस्त इराणच्या मदतीसाठी काश्मीर सरसावले; महिलांनी दान केले सोन्या-चांदीचे दागिने

spot_img

बडगाममध्ये मदतीचा ओघ सुरू असतानाच इराणचा अमेरिकेचे फायटर जेट पाडल्याचा खळबळजनक दावा

बडगाम/श्रीनगर: पश्चिम आशियातील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून, याचे पडसाद थेट जम्मू-काश्मीरमध्ये उमटताना दिसत आहेत. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे होरपळणाऱ्या सामान्य जनतेच्या मदतीसाठी बडगाममधील नागरिक मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. येथील मशिदीबाहेर विशेष स्टॉल लावून लोकांनी रोख रक्कम, तांब्याची भांडी आणि महिलांनी स्वतःचे सोन्या-चांदीचे दागिने उत्स्फूर्तपणे दान केले आहेत. माणुसकीच्या नात्याने इराणमधील प्रभावित कुटुंबांना आधार देण्यासाठी हा मदतीचा हात पुढे करण्यात आल्याचे स्थानिक नागरिक मोहसीन अली यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी होत बडगामचे आमदार मुंतज़िर मेहदी यांनी देखील आपला एक महिन्याचा पगार दान करण्याची घोषणा करत, कठीण काळात इराणच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

दुसरीकडे, युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणने हॉर्मुज बेटाजवळ अमेरिकेचे F-15 फायटर जेट एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे पाडल्याचा दावा केला आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने या कारवाईचा व्हिडिओ प्रसारित करत, याला ‘ट्रू प्रॉमिस ४’ मोहिमेचा भाग म्हटले आहे. या घटनेमुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असून, कालच इराणने इस्रायलच्या अणू प्रकल्पावर मिसाइल हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली होती. एकीकडे काश्मीरमधून शांततेचे आवाहन आणि मदतीचा ओघ सुरू असताना, दुसरीकडे जागतिक महासत्तांमधील हे युद्ध दिवसेंदिवस अधिक विनाशकारी रूप धारण करत असल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ