Iran Israel War : गॅस टंचाईचा फटका; धुळे शहरात मातीच्या चुलींना वाढती मागणी

spot_img

इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन आणि गॅस पुरवठ्यावर होत असून अनेक ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागानंतर आता धुळे शहरातील नागरिकही पर्याय म्हणून मातीच्या चुलींकडे वळताना दिसत आहेत.

गॅस सिलिंडर मिळण्यात होणारा विलंब आणि वाढलेला प्रतीक्षा कालावधी यामुळे घरगुती स्वयंपाकासाठी चुलींची मागणी वाढली आहे. धुळेतील कुंभार समाजाने या वाढत्या मागणीचा अंदाज घेत मडकी, भांडी यांसोबतच मातीच्या चुलींची विक्री सुरू केली आहे.

मात्र, चुली तयार करण्यासाठी लागणारी माती आणि लीद (गोठ्यातील शेण) मिळण्यात अडचणी येत असल्याने उत्पादनातही अडथळे निर्माण होत आहेत, असे कुंभारांनी सांगितले. सरकारकडून लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी गॅस वितरणातील विलंबामुळे नागरिकांना पुन्हा पारंपरिक स्वयंपाक पद्धतीचा आधार घ्यावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ