IPL 2026 : IPL 2026 चा थरार आजपासून! गतविजेत्या ‘आरसीबी’समोर इशानच्या ‘हैदराबाद’चे तगडे आव्हान

spot_img

चिन्नास्वामीवर रंगणार सलामीची लढत; विराटच्या बॅटकडे लक्ष तर इशान किशनच्या नेतृत्वाची होणार कसोटी

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, आज शनिवार, २८ मार्च रोजी आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा बिगुल वाजणार आहे. बंगळुरूच्या ऐतिहासिक एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. घरच्या मैदानात खेळणाऱ्या आरसीबीला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा मिळणार असून, अनुभवी विराट कोहलीकडून एका ‘चाबूक’ खेळीची अपेक्षा सर्वांना आहे. तर दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार इशान किशन आपल्या नेतृत्वाखाली पहिल्याच सामन्यात बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही संघांची फलंदाजी अतिशय स्फोटक असल्याने आज चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आरसीबीकडे फिल सॉल्ट, रजत पाटीदार आणि रोमारियो शेफर्ड यांसारखे ‘हिटर’ आहेत, तर हैदराबादकडे ट्रेव्हिस हेड, हेन्रिच क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांसारख्या आक्रमक खेळाडूंची फौज आहे. गोलंदाजीमध्येही दोन्ही संघ तोडीस तोड असून, आरसीबीची धुरा अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि सुयश शर्मा यांच्या खांद्यावर असेल, तर हैदराबादकडे शिवम मावी आणि हर्षल पटेल यांसारखे हुकुमी एक्के आहेत. एकूणच, आयपीएल २०२६ ची सुरुवात एका हाय-व्होल्टेज सामन्याने होणार हे निश्चित आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन:

  • **रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू**: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), टीम डेव्हीड, कृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफ
  • सनरायझर्स हैदराबाद: हेन्रिच क्लासेन, इशान किशन (कर्णधार/यष्टिरक्षक), अनमोलप्रीत वर्मा, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिविंगस्टोन, हर्षल पटेल, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स, शिवम मावी.
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ